विराट, हार्दिक, रोहितवर आरोप
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय संघाचे मुख्य निवड समितीप्रमुख चेतन शर्मा सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या एका मुलाखतीने भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. शर्मा यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सौरव गांगुलीपर्यंत भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू बनावट इंजेक्शन वापरण्याबाबत मोठमोठे दावे केले आहेत. भारतीय संघ 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी खेळणार आणि यावेळीच हे खळबळजनक दावे समोर आले आहेत आणि याच दरम्यान उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची निवड केली जाणार आहे.
झी न्यूज च्या स्टिंगमध्ये ते भारतीय क्रिकेटपटू तंदुरुस्त राहण्यासाठी इंजेक्शन घेतात आणि डोपिंग चाचणीमध्ये कोणते इंजेक्शन पकडले जात नाही हे देखील त्यांना माहित आहे, असे म्हणताना ते दिसत व्हिडिओमध्ये ते टीम इंडियाच्या अत्यंत गोपनीय गोष्टींवर बोलताना दिसत आहे. एवढेच नाही तर विराट कोहली आणि रोहित शर्माला संघातून बाहेर काढण्यासाठी विश्रांतीचे कारण पुढे केले जात असल्याचेही समोर आले आहे. चला जाणून घेऊया त्या 8 खळबळजनक दाव्यांबद्दल.
1. बनावट इंजेक्शन्स
पेन किलर आणि बनावट इंजेक्शन्स बद्दल बोलताना शर्मा म्हणाले, इंजेक्शन बद्दल बोलत आहे. जर त्यांनी वेदनाशामक औषधे घेतली तर ते डोपिंगमध्ये पकडले जाईल. टीम इंडियाच्या खेळाडूंना अँटी-डोपिंगमध्ये कोणते इंजेक्शन येतात हे माहीत आहे.
2. नकली फिटनेस
खेळाडूंच्या फिटनेसवर निवडकर्ता म्हणाले, खेळाडू तंदुरुस्त नसतील, तर खेळण्यासाठी ते इंजेक्शन घेतात. 80 टक्के फिटनेस असतानाही ते खेळण्यास तयार होतात. ते इंजेक्शन घेतात आणि खेळायला लागतात.
3. विराट-रोहित वाद
विराट आणि रोहितमधील वादावर चेतन शर्मा म्हणाले, विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही. पण त्यांच्यात अहंकार मध्ये येतो. ते दोघेही सुपरस्टार आहेत, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र सारखेच.
4. गांगुलीला कोहली नावडता
माजी बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली आणि विराट कोहली नात्याविषयी सांगताना ते म्हणाले, ‘गांगुलीने कधीही रोहितची बाजू नाही घेतली, पण त्यांना विराट कोहली आवडत नव्हता.’
5. विराटचे कर्णधार पद
चेतन शर्मा म्हणतात- विराट कोहलीला वाटत होते की बीसीसीआयच्या अध्यक्षांमुळे त्याला कर्णधारपद गमवावे लागले. निवड समितीच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये 9 लोक होते, गांगुलीने त्यांना एकदा विचार करायला सांगितले असेल. मला वाटते कोहलीने ते ऐकले नाही, माझ्यासह इतर 9 लोक आणि इतर सर्व निवडकर्ते, बीसीसीआयचे अधिकारी होते. कोहलीने कदाचित गांगुलीचे वाक्य ऐकले नसेल.
6. खेळाडूंना संघात आणले
चेतन शर्मा स्टिंगच्या या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटच्या भासविषयाबद्दल बोलताना ही दिसत आहेत. ते म्हणाले, ‘मी संघात सूर्यकुमार यादव, ईशान किशन, दीपक हुड्डा, शुभमन गिल इतर 15-20 खेळाडूंना आणले.’
7. हार्दिकचं कर्णधार
कर्णधारपदाबद्दल बोलताना निवडकरता म्हणाले, ‘टी-20 इंटरनॅशनल फॉरमॅटमध्ये शुभमन गिलला संधी देण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात येते. ते म्हणाले की, हार्दिक पांड्या दीर्घकाळासाठी कर्णधारपदाची धुरा सांभाळेल आणि रोहित शर्मा यापुढे टी-20 संघाचा भाग असणार नाही.’
8. जसप्रीत बुमराहचा फिटनेस
जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर चेतन शर्मा म्हणाले, जसप्रीत बुमराहला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो वाकू शकत नाही. याशिवाय एक-दोन खेळाडू आहेत जे इंजेक्शन घेतात. ते इंजेक्शन घेतात आणि मग सांगतात कि, आम्ही खेळण्यासाठी फिट आहोत.
बीसीसीआय कारवाई करणार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून शर्मा यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यांची निवड समितीतून हकालपट्टी होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. याबाबत बीसीसीआयने चेतन शर्मा यांना तातडीने खुलासा करण्याचे फर्मान सोडले आहे. बीसीसीआयचे अधिकारी आता स्टिंग ऑपरेशनबाबत बोलण्यास टाळत आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार म्हणाले की, बीसीसीआय लवकरच याबाबत अधिकृत निवेदन जारी करेल. यावर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. चेतन शर्माने ऑपरेशनमध्ये असा खुलासा केल्याने केवळ भारतीय क्रिकेटमध्येच नाही तर जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.