| महाड | प्रतिनिधी |
वरंध येथे अल्पवयीन 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिडीत मुलगी घरात एकटी असताना आरोपीने या संधीचा गैरफायदा घेत हा गंभीर गुन्हा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीचे वडील गावी गेले होते तर आई मजुरीसाठी बाहेर गेल्यामुळे मुलगी घरी एकटी होती. त्याचवेळी सचिन पांडुरंग सुतार (37), रा. वरंध असे आरोपीत याचे नाव असून, त्याने पाणी पिण्याच्या बहाण्याने पिडीत मुलीला घरात नेले. घरात कोणीही नसल्याचे पाहून आरोपी तिला घेऊन गेला आणि तिच्यावर बळजबरी केली. घरी परतल्यानंतर आईला मुलीकडून या घटनेची माहिती मिळाली. मुलीच्या आईने तातडीने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गंभीर प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी कार्यवाही सुरू केली असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या भयानक घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी मागणी केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.







