। मुंबई । वृत्तसंस्था ।
भांडवली बाजारात सकाळच्या सत्रात तेजीची लाट धडकली आहे. चौफेर खरेदीने शुक्रवारी सेन्सेक्सने प्रथमच 55000 अंकाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. दररोज नवनवे विक्रम करणार्या सेन्सेक्स आणि निफ्टीमुळे गुंतवणूकदार मालामाल बनले आहेत.
सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 245 अंकांच्या वाढीसह 55088 अंकावर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 75 अंकांनी वधारला असून तो 16440 अंकांवर आहे. या सत्रात आयटी आणि फायनान्स क्षेत्रात शेअरची जोरदार खरेदी झाली आहे. बाजार सुरु होताच सेन्सेक्सने 168 अंकांची झेप घेतली आणि तो थेट 55011 अंकावर पोहोचला. निफ्टी मंचावर महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, कोल इंडिया, टाटा मोटर्स या शेअरमध्ये वाढ झाली आहे. आयशर मोटर्सचा शेअर 2 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच टाटा स्टील, टेक महिंद्रा, सन फार्मा, पॉवरग्रीड या शेअरमध्ये घसरण झाली आहे.आजच्या तेजीत स्मॉल कॅप्स आणि मिड कॅप्स या दोन्ही श्रेणीतील शेअर्सने जोरदार वाढ नोंदवली आहे.