अँटीजन चाचण्या करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र पथके होणार स्थापन

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संशयीत रुग्णांची आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची त्वरित तपासणी करुन त्यांचे विलगीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याकरीता तालुकास्तरावर स्वतंत्र पथक तयार करण्यात यावे, सदर पथकाव्दारे पंचायत समिती, तहसिल कार्यालयांसह, इतर सरकारी कार्यालय व मोठया ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रामध्ये रॅपिड अ‍ॅटीजेन टेस्ट करण्यात याव्यात, अशा सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या आहेत.

रायगड जिल्हयामध्ये कोरोना रुग्ण संख्या व पॉझिटिव्हीटी रेट वाढताना दिसुन येत आहे. त्यातच संशयित व त्याच्या संपर्कातील व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचणीचे निष्कर्ष येणेसाठी 5 ते 8 तासाचा कालावधी लागत असल्यामुळे त्या निष्कर्षाचे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फारसा उपयोग होत नाही. त्या उलट रॅपिड अँटीजन टेस्टचा निष्कर्ष त्वरीत मिळत असल्या कारणाने कोरोना रुग्ण शोधणे व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे शोध घेणे सोईचे होते. तसेच रॅपिड अ‍ॅटीजेन टेस्ट करण्याकरीता स्वतंत्र पथक तयार करण्यात यावे. सदरच्या पथकाव्दारे पंचायत समिती, तहसिल कार्यालय तसेच इतर कार्यालय व मोठया ग्रामपंचायती कार्यक्षेत्रामध्ये रॅपिड अ‍ॅटीजेन टेस्ट करण्यात याव्यात, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version