। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दुखापत आणि आजारपण एखाद्या खेळाडूची शानदार कारकीर्द संपुष्टात आणू शकते. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू सर्जियो अग्युरोची कारकीर्दही धोक्यात आली आहे. तो खेळ सोडण्याचा विचार करत आहे. हृदयविकारामुळे तो वयाच्या 33 व्या वर्षी निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे.
बार्सिलोनासाठी कॅम्प नाऊ याठिकाणी अलावेस विरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याला या गंभीर आजाराची माहिती मिळाली. त्या सामन्याच्या 42 व्या मिनिटाला त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्यानंतर त्याला मकार्डिओलॉजिकल टेस्टफसाठी हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले. कॅटालुन्या रेडिओच्या माहितीनुसार, सर्जियो या आजारामुळे संन्यास घेऊ शकतो. त्याच्या हृदयाच्या चाचणीतून असे दिसून आले की त्याचा आजार जेवढे वाटले होते, त्यापेक्षा अधिक गंभीर आहे. त्यामुळे तो व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्त व्हावे लागू शकते.