उरणमध्ये अपघाताची मालिका सुरूच; रक्ताने माखताय रस्ते

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. जासई दास्तान-चिर्ले रेल्वे उड्डाण पुलावर अपघात झाल्याची घटना मंगळवारी (दि.29) रोजी घडली आहे. अंकिता मयेकर (29) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ट्रेलरने दिलेल्या धडकेने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही तरुणी नेहमीप्रमाणे मुंबईत कामावर जाते पण आज थोडा उशीर झाला आणि रेल्वे निघून गेली. वेळेवर पोहोचण्यासाठी दुचाकीने निघाली. पण ती वेळ तिच्या आयुष्याची शेवटची वेळ ठरली. हा उड्डाणपुल सुरू झाल्यापासून तिसरा-चौथा बळी. यावेळी पहिल्यांदाच एका तरुणीचा बळी गेला आहे. आज उरणमध्ये अपघात झाल्यावर हॉस्पिटल कुठे? उपचार कुठे? वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली असती तर अंकिता वाचली असती का? हा प्रश्न आता संपूर्ण उरणकरांना झोपवत नाही.

Exit mobile version