कर्जतच्या आमदारांवर सुरेश लाडांचे गंभीर आरोप

नजराणा न भरताच जमिन विक्री करण्याचा घाट
न्यू मिलेनियम कंपनीसाठी पायघड्या

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील नंदनपाडा परिसरात जमीन खरेदीसाठी न्यू मिलेनियम कंपनीला जमिन खरेदीची परवानगी देताना शासनाने कंपनीला जी नजराणा रक्कम भरायला सांगितली होती. ती रक्कम कंपनीने भरलेली नाही. त्यासाठी कंपनीकडून देण्यात आलेले धनादेश वटलेले नाहीत. त्यामुळे नजराणा न भरताच ही जमिन विक्री करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे नातेवाईक आणि अधिकारी यांच्याकडून या जागांची खरेदी सुरु झाली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गेली वर्षभर पाठपुरावा करूनही शासनाने याबाबत कुठलीच दखल घेतलेली नाही. राज्यसरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत संवेदनशील नाही असा गंभीर आरोप लाड यांनी अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
खालापूर तालुक्यातील नंदनपाडा परिसरात जमीन खरेदीसाठी न्यू मिलेनियम कंपनीला दिलेली परवानगी रद्द केली नाही, तर शेतकर्‍यांसह आत्मदहन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन त्यांनी याबाबतचे निवेदन सादर केले आहे. सनदशीर मार्गाने आंदोलन करूनही राज्यसरकार शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नसल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला. सरकार आघाडीचे आहे आमचे नाही अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.
खालापूर तालुक्यातील नंदनपाडा, गोहे, गोठीवली या गावात औद्योगिक प्रकल्पांसाठी जमिन खरेदी करण्यासाठी न्यु मिलेनियम कंपनीला 63-1-अ अन्वये परवानगी देण्यात आली होती. या आंतर्गत सुमारे 90 शेतकर्‍यांची साडेतीनशे एकर जमिन कंपनीने साटेकराराने अथवा अधिकारपत्राव्दारे खरेदी करण्यात आले होते. गेली दहा वर्ष त्यांनी त्या जागेचा वापर औद्योगिकरणासाठी केला नाही. आता या परीरात एमआयडीसी जाहीर होऊनही त्यांनी मंदीचे कारण सांगून या जागा औद्योगिकरणासाठी न देता इतर कारणांसाठी विकण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. हे नियमाला धरून नाही. त्यामुळे कंपनीला दिलेली जमिन खरेदीची परवानगी शासनाने रद्द करावी, शेतकर्‍यांच्या जागा त्यांना परत द्याव्यात अशी मागणी लाड यांनी यावेळी केली.    
सरकार आघाडीचे आहे. राष्ट्रवादीचे नाही अशी पुष्टी त्यांनी यावेळी जोडली. कंपनीला जमिन खरेदी आणि विक्रीसाठी दिलेली परवानगी रद्द केली नाही तर येत्या 23 डिसेंबरला आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी यावेळी दिला. यावेळी राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे उपस्थित होते.

Exit mobile version