| चणेरा | वार्ताहर |
नरेंद्र महाराज संस्थान दक्षिणपीठ नाणिजधाम महाराष्ट्र अंर्तगत उत्तर रायगड जिल्हा, रोहा तालुकाद्वारे गायचोळवाडीत नविन आरतीचे संतसंघाचे रुपांतर भव्य मिरवणूक करण्यात आले. यावेळी जगद्गुरू श्री ची प्रतिमा 300 ते 350 भक्तगणांच्या उपस्थितीत बिरवाडी कील्ला येथील भवानी मातेचे मंदीर ते गायचोळवाडी मंदिर या ठिकाणी आणण्यात आले. तसेच उत्तम तांडेल यांचे प्रवचन करण्यात आले. 13 संतसंघ केंद्रातील भक्तगण तसेच तालुका स्थानिक सेवा समिती पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, निरीक्षक, आध्यात्मिक प्रमुख, सामाजिक प्रमुख, जिल्हा सचिव, जिल्हा महिला अध्यक्ष, सुधागड तालुका अध्यक्ष, रोहा-सुधागड विशेष कार्यवाहक, स्थानिक गायचोळवाडी तसेच पंचक्रोशीतील कार्यक्रर्ते सदर कार्यक्रमाच्या ठीकाणी उपस्थिती दर्शविली. जिल्हा सचिव यांने उत्तम प्रकारे सुत्रसंचालन केले. तसेच तालुका अध्यक्ष यांने सर्वांचे आभार मानले.






