तळा तालुक्यात उद्यापासून सेवा पंधरवडा सुरु

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| तळा | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरीकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी आणि पारदर्शक प्रशासन निर्माण करण्यासाठी तळा तालुक्यातील सर्व गावांमध्ये अभियान राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत तीन टप्प्यात कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात पाणंद व शिवरस्त्यांचे सर्वेक्षण करुन क्रमांक देणे, नोंदी करणे आणि मोजणी करणे यावर भर दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे या योजनेसाठी उपलब्ध सरकारी जमीनीवरील 2011 पूर्वीचे निवासी घरे नियमानुकूल करणे आणि पात्र लाभार्थ्यांना पट्टे प्रदान करणे याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मा. जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक अर्थसहाय्य लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचे काम 100 टक्के पूर्ण करणे, आयुष्यमान भारत कार्ड मोहीम घेणे, स्मशानभूमीत जाण्या-येण्याकरीता रस्ता उपलब्ध असल्याबाबत खातरजमा करणे, तसेच त्यांचे जीवोटंग करणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ सामान्य जनतेला होणार आहे.

Exit mobile version