शाळांच्या भूखंडाचा प्रश्‍न मार्गी लावा

बाळाराम पाटील यांची सिडकोकडे मागणी

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

माजी आमदार बाळाराम पाटील यांनी गुरुवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांची भेट घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या व इतर शाळांना येणार्‍या भूखंडाच्या प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा केली.

दरम्यान, नागरिकांना सिडकोद्वारे चालू असलेल्या मोठ मोठ्या प्रकल्पांमुळे येणार्‍या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने ननावडे गावातील वाटप, स्थानिक नागरिकांनी गरजेपोटी बांधलेले घरे यामध्ये नैसर्गिक वाढीचे बांधकामे गावठाणातील बांधकामे लवकरात लवकर नियमित करणे व तोपर्यंत सिडको अतिक्रमण विभागाकडून तोडक कारवाई करू नये, या विभागात असणार्‍या स्थानिक कॉरिधारकांचे प्रश्‍न तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांना गावांमध्ये मोक्याच्या भूखंड देण्यात यावे, अशी मागणी केली. सदर चर्चेदरम्यान सिडकोचे अधिकारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवा मढवी, जयेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version