| अलिबाग | वार्ताहर |
सेवा संकल्प प्रतिष्ठान रायगड जिल्हातर्फे रविवार (दि. 7) मोफत वातविकार शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात वातविकाराच्या मोफत चाचण्या करण्यात आल्या तसेच डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी वैद्यकीय सल्ला देऊन मार्गदर्शन केले. सध्या सांधेदुखी हाता पायाला मुंग्या येणे इत्यादी वातविकार मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. त्यांचे योग्य निदान करून उपचार करण्यासाठी या चाचण्या आवश्यक ठरतात, म्हणून सर्वसामान्य लोकांना या चाचण्यांद्वारे योग्य निदान आणि उपचार मिळावेत यासाठी याप्रतिष्ठाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता असे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ प्रसाद दाभोळकर ह्यांनी सांगितले. या शिबिरात 115 नागरिकांनी लाभ घेतला. सदर शिबिरास कार्यकारणी सदस्या शुभांगी दाभोळकर ह्यांची विषेश उपस्थिती लाभली. शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक साष्टे, सरचिटणीस संदेश थळे, कार्यकारणी सदस्या श्रुती दाभोळकर यांनी विशेष मेहनत घेतली.






