| तेलंगणा | वृत्तसंस्था |
तेलंगणात पोलिस चकमकीत सात माओवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. तेलंगणा पोलिस आणि माओवाद्यांमध्ये रविवारी सकाळी मुलुगु जिल्ह्यातील एथुरंगाराम मंडलच्या चालपाका भागातील जंगलात चकमक झाली, असे पोलिसांनी सांगितले. या चकमकीत येलांडू-नरसंपेट क्षेत्र समितीचा कमांडर बद्रू उर्फ पपण्णा देखील ठार झाल्याची माहिती आहे. या चकमकीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही चकमक मुलुगु जिल्ह्यातील एतुरु नगरम चालपाका जंगल परिसरात झाली. सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये गोळीबार झाला. या घटनेत सात माओवादी ठार झाले. तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि माओवादी विरोधी पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांनी या चकमकीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. ठार झालेल्यांमध्ये प्रमुख माओवादी नेत्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. इलांदू नरसंपेट क्षेत्र समितीचे सचिव भद्रू उर्फ पपण्णा आणि त्यांच्या साथीदारांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कुरुसम मंगू ऊर्फ भद्रू ऊर्फ पपण्णा (वय 35), इगोलाप्पू मल्लया ऊर्फ मधू (43), मुस्की देवल ऊर्फ करुणाकर (22), मुस्की जमुना (23), जयसिंग (25), किशोर (22) आणि कामेश (22) अशी मृतांची नावे आहेत.
सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली आहेत. या कारवाईबाबत दक्षता घेत पोलीस विभागाने परिसरात शोधमोहीम सुरू ठेवली आहे. माओवाद्यांविरोधातील हे मोठे यश मानले जात असून, यामुळे या भागातील सुरक्षा स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली आहेत. या कारवाईबाबत दक्षता घेत पोलीस विभागाने परिसरात शोधमोहीम सुरू ठेवली आहे. माओवाद्यांविरोधातील हे मोठे यश मानले जात असून, यामुळे या भागातील सुरक्षा स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे.