| मुंबई । वृत्तसंस्था ।
निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन तपासणीसाठी दिल्या पाहिजे. आंतरराष्ट्रीय समितीने ईव्हीएम मशीनची तपासणी केली पाहिजे. ईव्हीएम मशीन हातात भेटलं पाहिजे. त्या मशीन मध्ये काही गुप्त कोड आहे का याची तपासणी जागतिक तज्ज्ञाकडून झाली पाहिजे. त्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमधील मतदानातील तफावत सध्या कळीचा मुद्दा झाला आहे. अनेक गावात मतदारांपेक्षा मतदानाचा टक्का अधिक असल्याचे समोर आल्याने विरोधकांच्या संशयाला जागा मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. 72 लाख मते कधी आणि कशी वाढली असा निशाणा नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर साधला आहे. महाविकास आघाडीतून निवडणूक आयोगावर हल्ले वाढले आहेत. तर दुसरीकडे पराभूत उमेदवारांनी आता फेर मतमोजणीचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी मोठी रक्कमही मोजली आहे.
जे निकाल लागले आहेत ते अनपेक्षित होते. मी जवळ जवळ 7 सार्वत्रिक निवडणुका लढलो आहे. कार्यकर्ताना अंदाज येत असतो. लोकशाही वाचवण्यासाठी बाबा आढाव यांनी आंदोलन केलं आहे. बाबा आढाव यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. 5 महिन्यापूर्वी महाविकास आघाडीला मोठ्या जागा मिळाल्या होत्या. पण विधानसभेला इतका मोठा बदल होईल असं दिसत नाही. प्रत्येकाला आत्मविश्वास होता सत्ता बदल होणार आहे. पक्ष फुटीचा जो विषय झाला त्याचा काहीच फरक पडला नाही याचा विश्वास बसत नाही. देशात लोकशाही आहे. निवडणुक फ्री आणि फेअर होणं आवश्यक आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
पंतप्रधानानी निवडणूक आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला अंदाज आला होता. द्वेष पसरवणारी भाषण मोदी योगी यांच्याकडून करण्यात आली त्यांच्यावर कारवाई केली नाही. निवडणूक आयोगाची जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही. मशीनवर जनतेचा विश्वास राहिला नाही. फेर पडताळणीचा काही फायदा होणार नाही. सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅटच्या चिठ्या मोजायला हव्यात. सरकार घाबरत असल्यानेच जनतेचा संशय बळावत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. लोकशाहीचा त्यांनी संपवण्याचा डाव रचला आहे. निवडणुकीत पोलिसांचा गैरवापर केला गेला आहे. पोलिसांकडून मतदान करून घेतलं. निवडणूक आयोग बोलवणार आणि लांबून मशीन दाखवणार आणि विचारणार पुरावा दाखवा. 5 टक्के मत मोजून काय फायदा होणार नाही. आपल्या हातात मशीन नाही. या मशीनमध्ये काही गुप्त कोड, प्रोगाम फीट केल आहे का? हे तपासावं लागणार आहे. तरच खरी माहिती समोर येईल असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. यापूर्वी उद्धव ठाकरे यांना भाजपाला फसवलंय. एकनाथ शिंदे यांना फसवू नये असं वाटत होतं पण तस झाले आहे, असा टोला त्यांनी लगावला.
मी उपोषण केलंय. मी 1952 सालापासून निवडणुका पाहतोय. मी येवढा पैश्याचा वापर कधी पहिला नाही माला हे अजब वाटत. अदानींना अमेरिकेतली कोर्टात पकड वॉरंट काढलं आहे. निवडणुकीतील तांत्रिक दोष हा माझ्यासाठी गौण आहे. पण परिकीय हस्तक्षेप झालाय का नाही? मोदी कित्येक दिवस पत्रकारांसोबत बोलायला देखील तयार नाहीत. सरकारने एकदा आयोग नेमला पाहिजे आणि तपास केला पाहिजे. परकीय हस्तक्षेप आतापर्यंतच्या निवडणुकीत कधी झालाय का? हे सरकार मस्तावले आहे. हे धोकादायक आहे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी केले आहे.