बिबट्याच्या हल्लात गंभीर जखमी

| आगरदांडा | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील उडरगांवानजीक असलेल्या तिसले आदीवासी जवळील जंगलात दिलीप भोईर यांच्यावर बिबट्याने प्राण घातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर मुरुड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

उडरगांवाचे रहिवासी असणारे दिलीप भोईर (45) हे सकाळी 6 च्या दरम्यान तसले आदिवासी जवळील जंगलात सुखी फाटी गोळा करण्याकरिता जात असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्या मानेवर हल्ला केला. त्याच्या मागुन येणाऱ्या महिलांनी आराडाओरड केल्याने बिबट्यानी पळ काढला. मात्र हल्ल्याचा प्रतिकार केल्यावर त्या झटापटीत दिलीप भोईर यांच्या मानेच्या काना जवळील जोरदार पंजाचा एक नख बसल्याने खोल जखम झाली असून त्यांना 7 टाके पडले आहेत व त्याच्या मागुन येणाऱ्या महिला मात्र सुरक्षित आहेत.

ग्रामस्थ आदेश भोईर यांनी सांगितले की, या परिसरात बिबट्याचा वावर आहे. अनेक जणांना बिबट्याचा दर्शन झाला आहे. तरी बिबट्याच्या हल्लात जखमींना संपूर्ण आर्थिक भरपाई मिळावी. तसेच बिबट्याला जेरबंद करुन अभयारण्यात सोडावे अशी मागणी यावेळी केली आहे.

वनपाल संतोष -रेवणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, बिबट्यानी हल्ला केला हे आम्हाला माहीत नाही. बिबट्या आहे की अजुन कोणता प्राणी आहे त्याचा तपास करत आहोत. जखमी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची पाहणी करून विचारपूस केली आहे

Exit mobile version