बोंझर सोसायटीतील सांडपाणी रस्त्यावर

दुर्गंधीमुळे पादचारी, वाहनचालक हैराण; नगरपालिकेविरोधात प्रचंड संताप

| खोपोली | प्रतिनिधी |

ताकई गावाजवळील बोंजर सोसाइटीतील सांडपाणी नाल्यातून शेतात सोडले जात असल्यामुळे शेतांमध्ये झाडेझुडुपे वाढली आहेत. विषारी सापांचा वावर वाढला आहे. नगरपालिकेने सांडपाण्याचे नियोजन करावे यासाठी शेतकरी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत; परंतु नगरपालिका दाद देत नसल्याने अखेर संतप्त शेतकर्‍यांनी नाल्यावर मातीचा ढिगारा टाकल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये तुंबले आहे. यादरम्यान पादचारी तसेच श्री सदस्यांची बैठकीतील महिला नाक मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. तर, वाहनचालकही हैराण झाले असून, संताप व्यक्त करीत आहेत.

ताकई गावात अनेक गगनचुंबी इमारती उभ्या राहात असल्यातरी सांडपाण्याचे योग्य नियोजन केले नसल्यामुळे बिनधास्तपणे सांडपाणी नाल्यातून शेतकर्‍यांच्या शेतात सोडले जात आहे. सर्वात मोठी बोंजर सोसायटीत 500 फ्लॅटधारक वास्तव्यास आहेत. निवोसह इतर इमारती आहेत. येथील सांडपाणी नाल्यातून शेतात सोडले जात असल्यामुळे शेतांमध्ये झाडेझुडुपे वाढली आहेत. विषारी सापांचा वावर वाढला आहे. नगरपालिकेने सांडपाण्याचे नियोजन करावे यासाठी शेतकरी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत; परंतु नगरपालिका दाद देत नसल्याने अखेर संतप्त शेतकर्‍यांनी नाल्यावर मातीचा ढिगारा टाकल्यामुळे सांडपाणी गटात तुंबत ताकई आडोशी रस्त्यावर साठले आहे. त्यातच रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे अवजड वाहने जाताना खड्ड्यांमध्ये तुंबलेला सांडपाणी पादचार्‍यांच्या अंगावर उडत आहे.पादचारी, वाहनचालक नाक मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. याबाबत अनेकवेळा नगरपालिकेत तक्रार करूनही सांडपाण्याची व्यवस्था केली जात नसल्यामुळे साजगांव पंचक्रोशीतील नागरिकांसह ताकई ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

ताकई गावात अनेक इमारती उभ्या राहात आहे. याठिकाणचा सांडपाणी आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. नगरपालिका सांडपाण्याचा नियोजन करण्यात अकार्यक्षम आहे. त्यामुळे ताकई रस्त्यावरील सांडपाण्याचे व्यवस्था करा अन्यथा नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करीत रास्ता रोको करावा लागेल.

किशोर पाटील, चिटणीस, शेकाप खालापूर तालुका

ताकई गावच्या हद्दीत अनेक इमारती उभ्या राहिल्याने लोकवस्ती वाढली आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी मुख्य गटार नसल्यामुळे बोंजर सोसायटीसह इतर इमारतींमधील सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे. आमचा कोणालाही त्रास देण्याचा होतू नाही.

समीर देवकर, अध्यक्ष, बोंजर सोसायटी ताकई
Exit mobile version