मलवाहिन्यांची होणार सफाई

रिसायकलर सिवर संक्शन कम जेटींग मशीन पालिकेच्या ताफ्यात

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण वाहिन्यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी 10 हजार 500 लीटर क्षमतेच्या दोन रिसायकलर सिवर संक्शन कम जेटींग मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. मलनिस्सारण विभागातील ही सर्वात अत्याधुनिक वाहने असून, या वाहनांमुळे मलनिस्सारण वाहिन्यांची साफसफाई अधिक चांगल्या पद्धतीने करता येणार आहे.

मलनिस्सारण वाहिन्यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी 10,500 लीटर क्षमतेच्या दोन रिसायकलर सिवर संक्शन कम जेटींग मशीन 150 ते 1200 मि.मी. व्यासाच्या मलवाहिन्यांमध्ये असलेला अडकलेला गाळ (चोकअप) काढण्यास ही वाहने सक्षम आहेत. या वाहनांमध्ये हायड्रॉलिक व्हॅक्यूम आणि हाय प्रेशर-हाय फ्लो वॉटर जेटिंग पंप व सुरक्षितता इत्यादी बाबी अंतर्भूत आहेत. हायड्रोडायनामिक क्लोनिंगच्या तत्त्वावर काम करणार्‍या व हाय प्रेशर जेटिंग सिस्टीमद्वारे सीवर आणि ड्रेनजच्या पाण्याच्या लाईन्स आणि चेंबर्सचे डी-चॉकिंग आणि डी-सिल्टिंग योग्य प्रमाणात करणे, सीवर जेटिंग पाईप आणि विशेष नोजलने साफ करण्याची क्षमता या वाहनांमध्ये आहे.

सांडपाण्याच्या विशिष्ट गुरुत्वाकर्षणावर अवलंबून व्हॅक्यूम तयार करुन अंदाजे 6 ते 8 मीटरच्या चेंबर सांडपाणी, द्रव स्लरी, गाळ आणि इतर साहित्य बाहेर काढण्याची क्षमता या वाहनांमध्ये आहे. सदर वाहनांच्या टाकीतील जमा झालेल्या गाळाची विल्हेवाट इच्छित स्थळी नेऊन गुरुत्वाकर्षण, प्रेशर डिस्चार्जद्वारे रिकामी केली जाणार आहे. यामधील खराब पाण्यांवर पुनर्प्रक्रिया (रिसायकल) करण्याची व्यवस्था या वाहनांमध्ये अंर्तभूत आहे. यामुळे साफसफाईतून जमा होणारे पाणी पुन्हा वापरात येणार आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली आहे.

साफसफाईकरिता सक्षम पर्याय
मलनिस्सारण विभागातील सर्वांत अत्याधुनिक अशी ही रिसायकलर सिवर संक्शन कम जेटींग ही मशीन आहे. ही मशीन उपलब्ध झाल्याने मलनिस्सारण वाहिन्या साफसफाई करण्याकरिता महानगरपालिकेकडे सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. सिडको प्रशासनाकडून मलनिस्सारण वाहिन्यांचे हस्तांतरण झाल्यानंतर महानगरपालिकेने नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्याकरिता ही वाहने घेऊन महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

Exit mobile version