अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

सावत्र पिता अटकेत

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

बेलापूर भागात राहणार्‍या एका 30 वर्षीय व्यक्तीने आपल्या 13 वर्षीय सावत्र मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. एनआरआय पोलिसांनी या सावत्र पित्याच्या विरोधात लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेतील आरोपी हा तक्रारदार महिलेचा दुसरा पती असून तो तक्रारदार महिला व तिच्या 13 वर्षीय पीडित मुलीसह बेलापूर भागात राहण्यास आहे. तक्रारदार महिला कामावर गेल्यानंतर अथवा रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी आरोपी आपल्या 13 वर्षीय सावत्र मुलीसोबत अश्‍लील व लैंगिक चाळे करून तिचे लैंगिक शोषण करत होता.

या प्रकारानंतर पीडित मुलगी रडल्यास आरोपी तिला मारहाण करण्याची धमकी देत होता. मागील पाच ते सहा महिन्यांपासून सावत्र पित्याकडून पीडित मुलीचे लैंगिक शोषण सुरू होते. अखेर मुलीने आपल्या आईला याबाबतची माहिती दिल्यानंतर तिने एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Exit mobile version