| पनवेल | प्रतिनिधी |
लग्नाचे आमिष दाखवून एका 29 वर्षीय तरुणीचे वर्षभर लैंगिक शोषण केल्याची घटना तळोजे परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी हि तळोजे फेज 2 येथे राहण्यास असून तिचे एका 25 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनतर जून 2022 ते एप्रिल 2023 या काळात त्या तरुणाने पीडित तरुणीचा विश्वास संपादन करीत लग्नाचे आमिष दाखवून मेघ रेसिडेन्सी या लॉजवर तसेच ठिकाणी नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर पीडित तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने स्पष्ट शब्दांत लग्नास नकार दिला. आपला विश्वासघात झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणीने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.