| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली पनवेलमधील पंचशील नगर येथील आरोपी अनिरुद्ध उर्फ अशीरउल्ला महंमद युनूस (वय 32) यास दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सहा वर्षाची तरुणी अल्पवयीन असतानाही आरोपी अनिरुद्ध उर्फ अशीरउल्ला याने तिच्याशी प्रेम संबंध ठेवून तिला लग्नाचे आमिष दाखवून सन 2011 ते 2013 पर्यंत वारंवार शारीरिक संबंध ठेवले, यामध्ये सदर तरुणी गरोदर राहिली. याबाबत तरुणीच्या तक्रारीनुसार खांदेश्वर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. सरकारी अभियोक्ताने न्यायालयासमोर केलेला महत्वपूर्ण युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा सुनावली.