सात वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील एका खासगी फार्महाऊसमध्ये सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून, पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीचे आई-वडील संबंधित फार्महाऊसमध्ये केअरटेकर म्हणून काम करतात. 20 ऑगस्ट रोजी आई आणि वडील कामानिमित्त बाहेर असताना आरोपीने मुलीला खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर कुटुंबियांनी नेरळ पोलिसांत तक्रार दाखल केली.

Exit mobile version