आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूचे लैंगिक शोषण

रायपूर | वृत्तसंस्था |
आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नेत्यावर करण्यात आला आहे. झारखंडमधील भाजपचे पश्‍चिम सिंहभूम जिल्हा माध्यम प्रभारी संजय मिश्रा उर्फ बुद्धु पंडित असं आरोप झालेल्या नेत्याचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी संजय मिश्राला अटक केली आहे. त्याला तुरुंगात ठेवलं असून अटकेआधी संजय मिश्रा याने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
 पीडित महिला खेळाडूने आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप संजय मिश्रा याच्यावर केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संजय मिश्राला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आङे. मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पीडित महिला खेळाडू आणि आऱोपींची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. यानंतर आऱोपी संजय मिश्राला अटक करण्यात आली.

Exit mobile version