जनावरांवर लैंगिक अत्याचार; विकृत तरुणाविरुद्ध गुन्हा

| रायगड | खास प्रतिनिधी |

मुक्या जनावरांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका तरुणाविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष प्रगास राजवंशी (23) रा. टेमघर, मूळ रा. बिहार असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी (दि.1) टेमघर येथील फिर्यादी महेंद्र इंदुलकर यांच्या गोठ्यातील दीड वर्षांच्या वासराबरोबर तर रविवारी (दि.3) गजानन उतेकर यांच्या गोठ्यातील म्हशी बरोबर त्याने अनैसर्गिक संबंध ठेवत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी संतोष विरोधात प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version