Minor Girl Abuse Case: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

| रेवदंडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील तेंबुर्डे आदिवासीवाडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी 1 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री तेंबुर्डे येथून पीडित अल्पवयीन मुलीला घेऊन जाऊन आरोपीने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. तसेच, लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नोव्हेंबर 2025 पासून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने पीडित मुलगी गरोदर राहिली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद मडावी हे करीत आहेत.

Exit mobile version