Crime News: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत तिच्याशी संबंध ठेवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोपीने पीडित मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून ऑगस्ट 2025पासून तिच्याशी संबंध ठेवल्याचा आरोप आहे. त्यातून पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 1 ऑगस्ट 2025 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपीने तिचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव आंगज करीत आहेत.

Exit mobile version