लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

। पनवेल । प्रतिनिधी ।

कल्याण येथे राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणाने कामोठे येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अत्याचारातून पीडित मुलीने एका मुलीला जन्म दिल्यानंतर आरोपी फरार झाल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हाफीज अन्सारी असे आरोपीचे नाव असून, तो कल्याण येथे राहतो. आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला लग्न करण्याचे आश्वासन देत तिच्याशी संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. या अत्याचारातून पीडितेला अपत्य झाले. मात्र, मुलीच्या जन्मानंतर आरोपी हाफीज अन्सारी फरार झाला. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Exit mobile version