लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवत तब्बल दीड वर्ष प्रौढाने वारंवार लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी संशयित प्रौढाला न्यायालयाने 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गोविंद अनंत घवाळी (45), रत्नागिरीअसे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्याविरोधात पीडित तरुणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित गोविंद घवाळी याने पीडितेशी ओळख करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याने ऑगस्ट 2023 ते 6 डिसेंबर 2024 या कालावधीत वारंवार जबरदस्तीने तिच्याशी शहरातील मांडवी, टीआरपी, गोडबोले स्टॉप, पंधरा माड, मिर्‍या बंदर, परटवणे या ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्याने पीडित तरुणीला वारंवार शिवीगाळ व मारहाणही केली. याबाबत पीडितेने सोमवारी (दि.9) रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी गोविंदला अटक केली आहे. मंगळवारी (दि.10) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

Exit mobile version