| पेझारी | वार्ताहर |
रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे आयोजित जिल्हास्तरीय हस्तलिखित स्पर्धेमध्ये को.ए.सो.ना.ना.पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पोयनाड यांनी तयार केलेले ‘शब्दगंध’ हस्तलिखित प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल को.ए.सो.ज्येष्ठ संचालक पंडित पाटील को.ए.सो. समन्वय समिती सचिव अशोक गावडे, वि.का. पाटील, लक्ष्मी-शालिनी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या चित्रकोटी, शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी हस्तलिखित प्रमुख कलाशिक्षक देवेंद्र पाटील, संपादक कमिटी सुनिता पाटील, सायली पाटील, तृप्ती पिळवणकर, सुवर्णा पाटील, संगीता पाटील तसेच, हस्तलिखितात साहित्य समावेश असलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.