मुंबई | प्रतिनिधी |
बॉलीवूडमधील प्रसिद्ध पटकथा लेखक शफीक अन्सारी यांचे बुधवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून जे आजारी होते. 2003 मध्ये आलेल्या अमिताभ आणि हेमा मालिनी यांच्या प्रसिद्ध बागबान या चित्रपटाचे लेखन शफीक यांनी केले होते. त्यामध्ये सलमान खान आणि महिमा चौधरी यांच्याही भूमिका होत्या. त्यावर्षीची सर्वाधिक हिट मुव्ही म्हणून बागबानचा उल्लेख केला जातो. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.