सुधागड-पाली | वार्ताहर |
पालीतील श्री स्वामी समर्थ नगर येथील एका 52 वर्षीय व्यक्तीने बुधवारी (दि.3) पहाटे 1.30 वाजल्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली आहे. मागील दीड महिन्यातील गळफास घेतल्याची ही तालुक्यातील 5 वी घटना आहे. महेंद्र दशरथ घोलीपकर यांनी पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटनेची पाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धीरज पाटील हे करीत आहेत.