माणगावात शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| माणगाव | प्रतिनिधी |

त्याग आणि समर्पणाचे प्रतीक हिंद-दि-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त विशेष कीर्तन आणि गुरु का लंगर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि.29 नोव्हेंबर 2025 सकाळी 9 ते सायंकाळी 4 यावेळेत गांधी मैदान, एच.पी.पेट्रोल पंपशेजारी मुंबई-गोवा महामार्ग, नाणोरे फाटा, माणगाव याठिकाणी होणार आहे.

या समागम कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक रायगड सिख सेवा चॅरिटेबल ट्रस्ट माणगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे. माणगाव शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन भव्य स्मरणोत्सवाचे आयोजन केले आहे. या दिवशी सकाळी 9.30 वाजता श्रीगुरु ग्रंथ साहिब यांचा प्रकाश, सकाळी 10 ते 12 सुखमणी साहिब पाठ (बिबियां दा जथा पुणे) चहा आणि पकोडा लंगर, 12 ते 1.30 गुरु तेग बहादूर साहेबांचा इतिहास, 1.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत ‌‌‘सरबत दा भला‌‌’ अरदास व गुरु का लंगर वाटप असे कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॅप्टन निर्मलसिंग रंधावा, गुरविंदर सिंह सोडी, वरिंदर सिंग बर्मन, गुरुविंदर सिंह भाटिया व सहकारी परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version