| कोल्हापूर | वृत्तसंस्था |
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोल्हापुरकरांनी अखेर मत आणि मान गादीलाच दिला आहे. शाहू महाराज छत्रपती विजयाच्या मार्गावर आहेत. त्यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यावर लीड घेतली. शाहु महाराज आतापर्यंत 70 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना 3 लाख 7 हजार 181 मते मिळाली आहेत. तर संजय मंडलिक यांना 2 लाख 37 हजार 594 मते मिळाली. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर महत्त्वाचा मतदारसंघ आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा हॉट सीट राहिली, याला कारण आहे काँग्रेसचे उमेदवार. या जागेवर काँग्रेसकडू छत्रपती शिवाजी महाराजांचे 12वे वंशज शाहू महाराज छत्रपती मैदानात होते. तर संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा महायुती अर्थात एनडीएने उमेदवारी दिली होती.
कोल्हापूर मतदारसंघात 71.59 टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यांत मतदान होण्याच्या सरासरीत कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. वाढीव मतदानात कोल्हापुरातील चंदगड आणि करवीर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापुरात 71.59 टक्के तर हातकणंगलेसाठी 71.11 टक्के मतदान झाले. करवीर तालुक्यात सर्वाधिक 79.61टक्के, त्याखालोखाल कागल तालुक्यात 73.1१ टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 65.31 टक्के इतके झाले.






