वैजाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शालिनी मोकल

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी  ।

तालुक्यातील वैजाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीच्या उमेदवार शालिनी प्रकाश मोकल यांची बहुमताने निवड करण्यात आली. सोमवारी थेट सरपंच शैला पाटील आणि शालिनी मोकल यांनी सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पदभार स्विकारला.

नुकत्याच पार पडलेल्या वैजाळी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सरपंच पदाच्या निवडणूकीत शेकापक्ष आणि शिवसेना आघाडीच्या उमेदवार शैला रविंद्र पाटील या बहुमताने विजयी झाल्या. त्यानंतर सोमवारी उपसरपंच पदाच्या निवडणूकीसाठी नवनिर्वाचित सरपंच शैला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्यात शालिनी प्रकाश मोकल यांची उपसरपंचपदी बहुमताने निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य अरुणा सिद्धनाथ पाटील, सारीका रामराजा मोकल, अविनाश जनार्दन मोकल, शालिनी प्रकाश मोकल व शर्वरी शैलेश ठाकूर आदी उपस्थित होते.

निवड झाल्यानंतर शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, माजी उपसभापती अनिल गोमा पाटील, शिवसेना तालुका प्रमुख शंकर गुरव, संघटक सतिश पाटील, माजी सरपंच सिद्धनाथ पाटील, पोलिस पाटील रविंद्र पाटील, गुरुनाथ पाटील, सुरेश पाटील, गुरुनाथ म्हात्रे, शशिकांत ठाकूर, नंदकुमार पाटील, प्रविण ठाकूर, अमोल पाटील, विजय ठाकूर, उदय ठाकूर, प्रदीप ठाकूर आदी उपस्थित होते.

Exit mobile version