| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अरुण हिराजी पाटील यांची चिरनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच सचिन घबाडी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदी चिरनेर ग्रामपंचायतीचे थेट सरपंच भास्कर मोकल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडणुकीत रिक्त झालेल्या उपसरपंचपदाच्या जागेसाठी चिरनेर ग्रामपंचायतीचे प्रभाग क्रं.1 मधील सदस्य अरुण पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी नवनिर्वाचित उपसरपंच अरुण पाटील यांना उपसरपंच पदाची सूत्रे हाती दिली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पनवेल महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, शेकापचे जासई विभाग चिटणीस सुरेश पाटील, माजी उपसभापती शुभांगी पाटील, चिरनेर गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, ग्रामविकास अधिकारी महेश पवार, रमाकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य पद्माकर फोफेरकर, दिपक कातकरी, समीर डुंगीकर, सदस्या वनिता गोंधळी, समुद्रा म्हात्रे, जयश्री चिर्लेकर, निकिता नारंगीकर, भारती ठाकूर, मृणाली ठाकूर, नीलम चौलकर यांच्यासह माजी मुख्याध्यापक दिलीप पाटील, बाळू मोकल, पराग ठाकूर, नितीन म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.