अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, सुदैवाने कोणीही जखमी नाही
| पेण | प्रतिनिधी |
शहरातील सुमतीबाई वि. देव विद्यालय या शैक्षणिक संकुलाच्या आवारात शनिवारी पहाटे बाटलीत पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला होता. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या ठिकाणी स्काऊट गाईडचे शिबीर सुरु होते. तेथील दोन तंबू जळाले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. याबाबतचा गुन्हा पेण पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे.
पेण शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई वि. देव विद्यालयामार्फत संकुलाच्या आवारात स्काऊट-गाइडचे शिबीर सुरू आहे. शिबिरासाठी शाळेच्या आवारातच विद्यार्थ्यांसाठी तंबू उभारण्यात आले आहेत. अज्ञातांनी प्लास्टिक बाटलीद्वारे शाळेच्या आवारात पेट्रोल बॉम्ब फेकला. उडालेल्या आगीच्या भडक्यात कोणीही जखमी झालेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शैक्षणिक संकुलाच्या जागेची पाहणी केली आहे.
शाळेच्या आवारात बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला होता. शाळेतील सीसीटीव्ही कॅमेर्यातील फुटेज तपासण्यात आले आहेत. लवकरच आरोपींना पकडण्यात येईल.
संदीप बागूल,
पोलीस निरीक्षक, पेण
शैक्षणिक संस्थेच्या संकुलाच्या आवारात स्काऊट-गाइडचे शिर3र सुरू आहे. तेथे विद्यार्थ्यांसाठी तंबू उभारण्यात आले होते. त्याठिकाणी अज्ञात व्यक्तीने बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा निंदनीय प्रकार केला आहे. या घटनेचा निषेध करतो.
संचालक मंडळ सु. वि. देव विद्यालय