शालू पांघरलेले देवकुंड; पर्यटकांचे आकर्षण केंद्र

डोंगरातून बारमाही पाणी

| माणगाव | वार्ताहर |

पाटणूस ग्रामपंचायत हद्दीतील भिरा हे टाटा वीज निर्मितीसाठी प्रख्यात आहे. तसेच ते साहस आणि सौंदर्याने ओथंबलेल्या धबधब्यामुळे देवकुंड परिसर हा निसर्ग प्रेमींना मोहात टाकणारा आहे. या डोंगरातून बारमाही पाणी धबधब्यातून पडते हा परिसर उन्हाळ्यातही थंड व स्वच्छ ऑक्सिजन देतो. जून महिन्यात पाऊस सुरु झाल्यानंतर या ठिकाणी दाट धुक्यामुळे स्वर्गात फिरत असल्याचा प्रत्यय येतो. इथे येणारा पर्यटक भूक-तहान, नाती-गोती, सुख:-दुख: विसरतोच. आणि निसर्गाच्या सानिध्यात त्याला असणार्‍या विविध आजारांचे कांही काळ विस्मरण होते. इथे येणार्‍या पर्यटकांना कॉलीफोर्निया पेक्षाही आकर्षीत करणारे येथील निसर्ग वेढ लावतो. त्यामुळे काय ती झाडी…! काय तो डाँगर…! काय ते धबधबे…! समद देवकुंडला हाय…! अशा उस्फूर्तपणे भावना पर्यटकातून व्यक्त होतात.

देवकुंड धबधब्यातून पडणार्‍या बारमाही पाण्यावर पुढे कुंडलिका नदीचा उगम झाला आहे. येथील डोंगर, दर्‍या, दाट घनदाट झाडी, नदीतून बारमाही वाहणारे स्वच्छ पाणी, डोंगरातील धुक्यातून रस्ता काढत हजारो मीटर वरून पडते. त्यामुळे पडणार्‍या या पाण्याने तयार झालेले फेसाळ धबधबे या निसर्गात येणारा पर्यटक निसर्ग प्रेमी यांना आस लागत आहे. येथे पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे देवकुंडला पर्यटन क्षेत्रात नवी ओळख मिळाली असून ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. देवकुंड हे पर्यटकांना आकर्षीत करीत आहे. या धबधब्याचे पाणी तळावर पडुन निसर्गनिर्मीत तलाव तयार झाला आहे. तो किती खोल आहे याचा अंदाज येत नाही. बारमाही हे पाणी डोंगरातुन वाहत असल्याने हे धबधबे बारमाही पाहायला मिळतात. इथला निसर्ग डोंगर द-यामधुन वाहणारे शेकडो धबधबे हा मुंबई पुण्याच्या पर्यटक, निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी, विदयार्थी, अभ्यासक, ट्रॅकसयांना भुरळ घालते. त्यामुळे भिरा हे ठिकाण जसे ट्रॅकर्ससाठी नावाजलेले आहे तसेच ते धबधबे आणि निसर्गांनी नटलेले आहे. हिरवा शालु पांघरलेले हे ठिकाण अनेकांना भेडसावत आहे. पुणे येथून 100 किमी अंतर, विळे गावापासून 12 कि.मी. अंतर, भिरा येथून देवकुंड धबधबा येथे जाण्यासाठी साधारण 6 कि.मी. पायवाट अतिशय खडतर पण मनोरंजक आहे. त्यामुळे तालुक्यातील देवकुंड धबधबा हा ट्रॅकर आणि धबधबेसाठी पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे.

Exit mobile version