। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा क्रिकेट असो.च्या कार्यकारणीच्या सभेमध्ये शंकर दळवी यांची प्रशिक्षक कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. शंकर दळवी हे लेव्हल 1 प्रशिक्षक म्हणून प्रमाणित आहेत. जिल्हाच्या क्रिकेट संघात दीर्घ काळ खेळाडू व कर्णधार म्हणून त्यांनी योगदान दिले आहे. दळवी यांनी महाराष्ट्र रणजी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक, महाराष्ट्र महिला संघाच्या 19/23 वर्षाखालील व वरिष्ठ महिलांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक, बीसीसीए तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पश्चिम विभागाच्या वरिष्ठ महीला संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. दळवी यांना प्रशिक्षक म्हणून 15 वर्षांचा दिर्घ अनुभव असल्याने त्यांच्याकडे रायगड जिल्हा क्रिकेट असो.च्या सर्व वयोगटातील मुलामुलींच्या प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.