। रोहा । वार्ताहर ।
रोहा नगरपालिका अंतर्गत अष्टमी उर्दू शाळा क्र.5 या शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम गुरुवारी (दि.19) रोजी पार पडले. अष्टमी मुस्लिम समाज अध्यक्ष म. शफी पानसरे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे तर केंद्रप्रमुख ईश्वर लाडे यांच्या हस्ते नाणेफेकी करून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
शाळेच्यावतीने दरवर्षी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत जय पराजय होत असताना मुलांनी खेळ खेळाडूवृत्तीने खेळावे. क्रीडा हा देखील शिक्षणाचा भाग असून खेळामुळे आपण तंदुरुस्त राहतो व आपले आरोग्यदेखील फिट राहते, असे मौलिक विचार केंद्र प्रमुख ईश्वर लाडे यांनी व्यक्त केले. यावेळी मुस्लिम जमातीचे उपाध्यक्ष मुबीन दळवी, अफसर करजिकर, राहील नागोठकर, अ. रशीद डबीर, मुनव्वर पठाण, मन्सूर दर्जी, अजीम नाडकर, मन्सूर कचकोल, अल्ताफ चोरडेकर, अ. रहीमन नाडकर, इम्रान बुखारी, वसीम दळवी, नम्रता पानसरे, पूजा खुळे, जबीन मिटकर आदी ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.