| भाकरवड । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील वडखळ गावचे रहिवासी शंकर सखाराम पाटील यांचे सोमवार (दि. 20) वयाचा 74 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते रायगड पोलीस दलात कार्यरत होते. त्यांनी ड्रिल इन्स्टक्चर म्हणून बरेच वर्ष सेवा केली. महाराष्ट्र पोलीस व रायगड पोलीस या कबड्डी संघाचे उत्कृष्ट खेळाडू होते. त्यांचं निधनाची वार्ता कळताच संपूर्ण वडखळ पंचक्रोशीवर शोकांतिका पसरली. त्यांच्यावर वडखळ गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यांच्या पच्यात दोन मुलगे, तीन मुली, सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे त्याचे उत्तर कार्य दहावा घरच्या स्वरूपात बुधवार (दि. 30) तर तेरावे शुक्रवार 2 डिसेंबर रोजी राहत्या घरी वडखळ येथे होणार आहे.