शानची राष्ट्रीय स्पर्धेत निवड

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल येथील बॉक्सिंगपटू शान धीरज उरणकर याने खेलो इंडिया अंतर्गत भारतीय बॉक्सिंग महासंघातर्फे बेंगलोर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय साउथ टॅलेंट हंट बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले असून शानची आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे. जयप्रकाश नारायण नॅशनल युथ ट्रेनिंग सेंटर बेंगलोर येथे ओपन टॅलेंट हंट बॉक्सिंग स्पर्धा नुकतीच पार पडली होती.

या स्पर्धेत पनवेलच्या शानने उत्तुंग कामगिरी करून पनवेलकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत शान महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून या स्पर्धेतील विजेत्यांची निवड आगामी आशियाई व आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांकरीता होणार आहे. शान व्ही.के.ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत शास्र शाखेत शिकत आहे. त्याला प्रशिक्षक अद्बैत शेंबवणेकर यांच्याकडे बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या दैदीप्यमान यशाबद्दल पनवेल शहरातील राजकीय, सामाजिक, क्रीडा, साहित्य, पत्रकार आदि स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version