। उरण । वार्ताहर ।
पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित राष्ट्रीय किक बॉक्सिंग दिनानिमित्ताने जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये गोशीन रियू कराटे संघटनेच्या उरण व पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी विविध वजनी गटात पदके पटकावली. अमिता घरत, अमिशा घरत, रोहित घरत, शुभम म्हात्रे यांनी सुवर्णपदक जिंकले. अमर घरत, करण प्रदीप पाटील यांनी रौप्य; तर अंश राजेंद्र म्हात्रे याने कास्य पदक पटकाविले. सुवर्णपदक विजेत्यांची नगर जिल्ह्यात होणार्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत निवड झाली.या विद्यार्थ्यांना शिहान राजू कोळी, गोपाळ म्हात्रे,राकेश म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.