। अलिबाग । वार्ताहर ।
शांताबाई शांताराम भगत यांचे सोमवारी (दि.1)वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. आपल्या रुपाने संगीत भजनाच्या सेवेसाठी धडपडणारी भजन सेविका हरपली. माणसातील माणुसकीची नाती जपणारी एक बहुआयामी, प्रेमळ व मनमिळाऊ, अध्यात्मिक विचार, धार्मिक आचारण व समाज सेवी स्वभाव अशा विविध पैलूंनी समृद्ध असे व्यक्तिमत्व.
शांताबाई भगत यांना संगीत भजन क्षेत्राची खूप आवड होती. त्या मोठे शहापूर गावातील गणपतीच्या मंदिरात एकादशी निमित्ताने महिलांनस एकत्र घेउन भजनाचा कार्यक्रम करत असतं. त्यातूनच पुढे आदर्श महिला भजन मंडळ मोठेशहापूरची स्थापना झाली. त्यांचे या भजन मंडळ निर्मितीत अमूल्य योगदान होते. त्यांनी या माध्यमातून शहापूर गावचा आध्यात्मिक वारसा जपला. मंडळाच्या माध्यमातून बचत गटाची स्थापना केली. अध्यात्मिक योगदान सोबतच सामाजिक राजकिय प्रवास ही मोलाचा होता. तसेच, शांताबाई भगत या शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या व ग्रुप गांमपंचायत शहापूरच्या सदस्या ही होत्या.