शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

। पुणे । प्रतिनिधी ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांना आज पुण्यातील रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शरद पवार यांच्या छातीत कफ साचल्याने आणि श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना सोमवारी (दि.9) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 5 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा झाली असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. मात्र पुढील काही दिवस पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Exit mobile version