। मुंबई । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळे त्यांना दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना काल संध्याकाळीच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर सध्या रुग्णालयातच उपचार सुरु आहेत.
त्यांना गुरुवारी सकाळी अकरा वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी दिली होती; पण डिस्चार्ज देण्यात आला नाही. यामुळे शिर्डी येथे होणार्या राष्ट्रवादीच्या अभ्यास शिबिरात ते सहभागी होणार नाहीत.