| महाड | प्रतिनिधी |
महाड परिसरात अनेक केमिकल कंपन्या असून, या कंपन्या सुरक्षिततेच्या बाबतीत अत्यंत लापरवाही करताना दिसत आहेत. कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता केवळ आपले हित जोपासत असताना दिसतात. येथे अनेक वर्ष विविध कंपन्यात छोटे मोठे अपघात घडून अनेक कामगार मृत्यूमुखी तसेच जखमी तर काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. अनेक वेळा गॅस गळती होऊन आजूबाजूच्या गावाना स्थलांतर करण्याची वेळ येते. यावर कोणतेच ठोस उपाय करताना प्रदूषण मंडळ दिसत नाहीत. याची भरपाई ही पुर्ण पणे कामगारांना मिळताना दिसत नाही. मग या कंपन्याचे आणि प्रदूषण मंडळाची आर्थिक देवाण घेवाण तर नाही ना असे प्रश्न जनतेला पडलेले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी तर यावर चुप्पी घेणंच पसंत करताना दिसतात. कारण याचे कंपन्याच्या जीवावर मलिदा खाण्याच काम हे लोकप्रतिनिधी करतात का? हा सवाल कामगार करत आहेत.
गेले अनेक वर्ष येथील प्रसोल कंपनी मध्ये छोटे मोठे अपघात घडून कामगारांचे मृत्यू झाले आहेत. या कंपनीतून निघणाऱ्या केमिकलं मुळे येथील कामगार तसेच आजूबाजूच्या नागरिकांना भयानक त्रास होत असेल असताना या बेजबाबदार कंपनीला बंद करून टाळे लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मा. प्रांतधिकारी यांना निवेदन दिले आहे. तसेच यावर कडक कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. हे निवेदन देताना तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ, जिल्हा सचिव हर्ष कांबळे. तालुका सचिव संदीप मालगुंणकर., शहर अध्यक्ष पराग वडके तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.







