सातार्यात उतरवणार काँग्रेसचं मकार्डफ!
| सातारा | वृत्तसंस्था |
सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार कोण असणार? याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे, कारण विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक लढायला नकार दिला आहे. श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्यामुळे शरद पवार सातार्यात नव्या उमेदवाराच्या शोधात आहेत, त्यातच या जागेवरून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली, त्यामुळे या चर्चांना आखणी उधाण आलं आहे.
सातार्याच्या उमेदवाराबाबत अखेर पृथ्वीराज चव्हाण यांनी खुलासा केला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. 48 पैकी जवळजवळ सर्वच जागांवर एकमत झालं आहे, सातारा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच आहे, माझी जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली आहे, हा निर्णय शरद पवारांना घ्यायचा आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
मला आदेश दिला तर माझी लढायची तयारी आहे, पण हा निर्णय शरद पवारांना द्यायचा आहे, असं सूचक विधानही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. शरद पवार जो उमेदवार देतील, त्याच्यामागे ताकदीने उभे राहू. हा मतदारसंघ तुतारीचा विषय आहे, तुतारीचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. सातारा लोकसभा काँग्रेसने लढवावी म्हणून अजून प्रस्ताव आला नाही, जर आला तर विचार करू, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाणांनी दिली. शशिकांत शिंदे यांचा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.