मविआबद्दल शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

। अमरावती । वृत्तसंस्था ।

रविवारी (दि.23) शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. आज आमची आघाडी आहे. 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढणार की नाही, हे आता कसं सांगणार. एकत्र काम करायची इच्छा आहे, पण इच्छा पुरेशी नसते, त्यामध्ये जागांचे वाटप अजून काहीचं केलं नाही. त्यामुळं त्याबाबत कसं सांगता येईल, असे शरद पवार म्हणाले.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार अशी चर्चा जोर धरत आहे. तर दुसरीकडे शरद पवारांनी महाविकास आघाडीबाबत केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Exit mobile version