म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अभिष्टचिंतन करण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण पाच गाव आगरी समाज सामाजिक सभागृहात प्रसारीत करण्यात आले होते.
सुरवातीला आमदार अनिकेत तटकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेे.यावेळी तालुका अध्यक्ष समीर बनकर,कृषि सभापती बबन मनवे,माजी सभापती नाझीम हसवारे, प्र.सभापती संदीप चाचले, माजी नगराध्यक्षा जयश्री कापरे,महिला अध्यक्षा रेश्मा काणसे,शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर,नगरसेविका सरोज म्हशीलकर, अनिल बसवत,लहुजी म्हात्रे,महेश घोले,किरण पालांडे, चंद्रकांत कापरे, राजु लाड,मंगेश म्हशीलकर,शेखर खोत,नईम दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.