| रोहा | प्रतिनिधी |
आई करंजाई कबड्डी संघ शेडसई, जय हनुमान क्रिकेट संघ, नवतरुण मित्र मंडळ मुंबई व शेडसई ग्रामस्थ यांच्या वतीने व चणेरा विभाग असोसिएशन यांच्या सहयोगाने संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन युवा कार्यकर्ते शशिकांत कडू, ग्रा.पं.सदस्य राजेश्री राजन पाटील, शेडसई गाव अध्यक्ष चंद्रकांत गायकर, माजी उपसरपंच ललिता उत्तम मोरे, चणेरा विभागीय अध्यक्ष प्रफुल पवार, प्रसन्ना घाग, परशुराम बोले, कमलाकर पाष्टे काशिनाथ मांडळेकर ग्रामस्थ आदींच्या हस्ते करण्यात आले.
शेडसई येथे संपन्न झालेल्या व कबड्डी प्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या या विभागीय कबड्डी स्पर्धेत जय भवानी बिरवाडी संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करून स्पर्धेतील विजेतेपद पटकावले. तर, द्वितीय क्र. जय हनुमान खांदाड व तृतीय क्र. जय हनुमान आदिवासी वाडी खांदाड यांनी पटकावले.
उत्कृष्ट पक्कड राहुल जंगम खांदाड-आदिवासी वाडी, उत्कृष्ट चढाई ओंकार कुळे खांदाड गाव व सामनावीर म्हणून किरण भालेकर बिरवाडी यांना ग्रा.माजी सदस्य मंगेश कोटकर, उत्तम मोरे, राजन पाटील व नरेश मोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.