शीना बोरा हत्याकांड – इंद्राणी मुखर्जीला जामीन

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
शीना बोरा हत्याकांड प्रकरणी गेली 10 वर्षे तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आम्हाला खटल्याच्या गुणदोषांवर कोणतेही भाष्य करायचे नाही. पण त्या साडेसहा वर्षांपासून तुरुंगात आहे आणि खटला लवकर संपणार नाही, हे लक्षात घेतले आहे. कोर्टाने म्हटले की, इंद्राणीने सहआरोपी जामिनावर बाहेर असताना आधीच साडेसहा वर्षे तुरुंगात घालवली आहेत. हे प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे.

सीबीआयनेही या हायप्रोफाईल हत्याकांडाचा तपासही केला होता. ही एक अशी मर्डर मिस्ट्री आहे, जिचे गूढ आजपर्यंत उलगडलेले नाही. हत्येचे गूढ इतके गुंतागुंतीचे होते की सुरुवातीला शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जीने तिची बहीण असल्याचे सांगितले होते, मात्र पोलिसांच्या चौकशीत तिने ती आपली मुलगी असल्याचे उघड केले. इंद्राणी मुखर्जीने दोन लग्न केली होते. शीना बोरा ही तिच्या पहिल्या पतीची मुलगी होती.

Exit mobile version