| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील वेश्वी येथील मथुराबाई गोपाळशेठ मुंबईकर यांचे शनिवारी (दि.15) वृद्धापकाळाने निधन झाले आहे. निधनसमयी त्या 80 वर्षांच्या होत्या. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ मुंबईकर यांच्या त्या पत्नी होत्या. वेश्वी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध पक्षातील व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी तसेच सगेसोयरे, नातेवाईक, ग्रामस्थ व मित्रपरिवार उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पती गोपाळ मुंबईकर, तीन विवाहित पुत्र, एक विवाहित कन्या, चार सुना, 12 नातवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी सोमवारी (दि.24) श्रीक्षेत्र नाशिक येथे होईल. तर, गुरुवारी (दि.27) सकाळी 8.30 वाजता होम विधी आणि दुपारी ठीक 12 वाजता उत्तर कार्याचा विधी वेश्वी येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती मुंबईकर परिवारातर्फे देण्यात आली.